शुक्रवार, 5 जुलाई 2024

Land Map: फक्त गट नंबर टाका आणि पहा तुमच्या जमिनीचा नकाशा

Land Map: फक्त गट

नंबर टाका आणि पहा तुमच्या जमिनीचा नकाशा, जाणून घ्या सविस्तर माहिती

असा पाहा जमिनीचा नकाशा..


१) कोणत्याही जमिनीचा नकाशा ऑनलाइन पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम गुगलवर


mahabhunakasha.mahabhumi.gov.i


n सर्च करावे.


= ==


२) सर्च केल्यानंतर तुमच्यापुढे एक पेज ओपन होईल, या पेजवरील डाव्या बाजूला तुम्हाला Location हा कॉलम दिसेल. या कॉलममध्ये तुम्हाला तुमचं राज्य, 'कॅटेगरी'त रुरल म्हणजेच ग्रामीण आणि अर्बन म्हणजेच शहरी असे दोन पर्याय असतील. तुम्हाला सोयीनुसार पर्याय निवडावा लागेल. Land Record


३) यानंतर तुमचा जिल्हा, तालुका व गाव निवडून village mapवर क्लिक करून तुमची शेतजमीन / जमीन ज्या गावामध्ये येते, त्या गावाचा नकाशा मोबाईल वरील स्क्रीनवर ओपन होतो. 'होम' पर्यायापुढील आडव्या बाणावर क्लिक करून हा नकाशा पूर्ण स्क्रीनमध्ये सुध्दा पाहता येतो.


४) त्यानंतर डावीकडे + अथवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातसुध्दा पाहता येतो. त्यापुढे डावीकडे तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसतील, त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला पहिल्या पेजवर परत जाता येईल.


असा डाऊनलोड करा जमिनीचा नकाशा...


नकाशाच्या पेजवर search by plot number हा कॉलम असून तेथे तुमच्या ७/१२वरील गट क्रमांक टाकावा. नंतर जमिनीचा गट नकाशा उघडतो. 'HOME' या पर्याया पुढील आडव्या रेषेवर क्लिक करून - या बटणवर क्लिक केल्यास तूम्ही संपूर्ण नकाशा पाहू शकता. डाव्याबाजूला plot info या कॉलमखाली तुम्ही टाकलेल्या गट नकाशामधील शेतजमीन/जमीन ज्याच्या नावावर आहे, त्याचे नाव आणि किती जमीन आहे, याची संपूर्ण माहिती दिसेल.


एका गट नंबरमध्ये ज्याची ज्याची जमीन असेल त्याची तपशीलवार माहिती तुम्हाला पाहता येईल. ही सगळी माहिती पाहिल्यानंतर डावीकडे सर्वात शेवटी map report यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या जमिनीचा plot report दिसेल. त्यावर उजव्याबाजूला खाली दिशा असलेल्या downward arrow वर क्लिक केल्यास तुमचा नकाशा डाऊनलोड होईल. 


Link येथे क्लीक करा भूनकाशा लिंक mahabhunakasha

 https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें